“एका पराभवाची शोकांतिका”
————————————–
धुसमटत चाललेल्या प्रयत्नांच्या लहरीतून अश्या अनेक लहरींच्या वाटा नकळत किंवा दिशाहीन स्वमार्गदर्शनामुळे भटकत होत्या. पराभवाच्या ह्या लहरी पाहून खुद्द पराभवाला ही गर्व चढत असावा. पण, प्रयत्नांना न हरलेल्या जिगराला रोखणं किती अवघड असेल हे पराभवाला ही माहीत नसावं...... शेवटी जिद्दीनं भरलेला माणूस....!!!! एक वेळी वाहणाऱ्या याचं पराभवाच्या लहरी कधी यशाच्या लौकिक किरण प्राप्त करून आयुष्य तेजमय बनवून गेल्या, हे त्या अपयशाच्या लहरींना कळालही नाही!!!!!