महात्मा गांधी जयंती विशेष……

स्वतः ला ओळखण्यासाठीचा सर्वश्रेष्ठ उपाय म्हणजे स्वतःला दुसऱ्यांच्या सेवेत झोकून देणे!!!! – महात्मा गांधी.

आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस. त्यांचं संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. 2 ऑक्टोबर हा दिवस लालबहादूर शास्त्री जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. आज मी तुम्हाला महात्मा गांधी यांनी जगाला दिलेले व सांगितलेले ११ महाव्रते सांगणार आहे.

महात्मा गांधी यांचे सिद्धांत:-. १) सत्य २) अहिंसा ३) अस्तेय ४) अपरिग्रह ५) ब्रम्हचर्य ६) शरीरश्रम ७) अस्पृश्यता ८) अभय ९) स्वदेशी १०) अस्वाद ११) सर्वधर्मसमभाव.

१) सत्य ( Truth):- कितीही संकटे आली तरी सत्य कधीच हारत नाही. म्हणून म्हटले आहे “सत्यमेव जयते”!!!

२) अहिंसा (Nonviolence):- महात्मा गांधी हे अहिंसेचे सर्वात मोठे अनुयायी होते. महात्मा गांधी यांनी जगाला सर्वात मोठा उपहार दिला आहे “अहिंसा”. आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याचे वाईट व्हावे असे वाटणे ही सुद्धा एक हिंसा आहे. याचमुळे आज “जागतिक अहिंसा दिवस” साजरा केला जातो.

३) अस्तेय (चोरी न करणे / No stealing) :- कोणाचीही वस्तू चोरणे ही चोरी आहे, पण कोणाची तरी वस्तू त्याच्या परवानगीशिवाय घेणे ही सुद्धा चोरीच आहे.

४) अपरिग्रह ( गरजेपेक्षा जास्त साठवून न ठेवणे/Non possession):- आपल्याला जेवढी गरज आहे तेवढेच घेणे योग्य आहे. महात्मा गांधी या वरून आपल्याला हेच सांगतात की, आपल्याला आपली आवशक्यता कमी करणे योग्य आहे. आपण आपली आवशक्यता कमी केली तर ज्यांना जास्त गरज आहे त्यांना त्या वस्तू भेटतील.

५) ब्रह्मचर्य (self discipline):- आपले मन आणि इंद्रिये यावर आपले नियंत्रण ठेवणे. आपल्या खाण्या-पिण्यावर संयम ठेवणे हे सुद्धा ब्रह्मचर्य आहे.

६) शरीरश्रम/ स्वावलंबन (आत्मनिर्भरता):- आपण आपली कामे आपणच करायला पाहिजे. ‘ईश्वर ज्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत स्वतः करतो.’

७) अस्पृश्यता (Remove Untouchability):- आपला देश हा जगातील सर्वात मोठा प्रजासत्ताक देश आहे. आपल्या देशात विविध धर्म , विविध जाती आहेत. जातिवाद, भेदभाव, धर्मभेद, लिंगभेद हे आपल्या देशाच्या एकतेवर परिणाम करतात. आपल्याला आहे अस्पृश्यता काढणे आवश्यक आहे.

८) अभय (निर्भयता/ Fearlessness):- सत्याच्या वाटेवर चालताना भीती वाटत नसते. तुम्ही नेहमी सत्याच्या बाजूने चालाल तर तुम्ही नीट आणि निर्भय राहाल.

९) स्वदेशी (Use locally made goods):- आपल्या भारतात उत्पादित व बनवलेले जाणाऱ्या वस्तू व उत्पादनांना स्वदेशी म्हणतात. महात्मा गांधी नेहमी स्वदेशीला प्रोत्साहन देत. खादी आणि चकरा हे याचे प्रतिक आहे. स्वदेशी वस्तू बनवल्याने उद्योजक यांचा व्यापार वाढतो तर बेरोजगार व कामगारांना काम मिळून बेरोजगारी कमी होते आणि देशाच्या विकासात मदत होते.आपण सुद्धा स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन दिले पाहिजे व ते खरेदी केले पाहिजे.

१०) अस्वाद (Control of the palat/ स्वादाचा त्याग):- स्वाद आहे म्हणून लोक काही खातात. स्वादामुळे म्हणजेच अशारीरिक पदार्थांमुळे जास्तीत जास्त लोक आजारी पडतात. म्हणून आपण त्याचा त्याग करणे आवश्यक आहे.

११) सर्वधर्मसमभाव (Equality of all religions):- आपल्या समाजात सर्व धर्माचे लोक राहतात. हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन पारशी व इतर धर्माचे लोक राहतात. कळवा धर्म समान आहेत हे आपण ओळखून गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे. कळवा धर्मांचे प्रमुख सण एकत्र येऊन साजरे केले पाहिजे.

या संपूर्ण ११ महाव्रतांचे आपण आपल्या आयुष्यात पालन करणे गरजेचे आहे. मी पण पालन करणार…. तुम्ही सुद्धा पालन करा. जय हिंद!!!! जय भारत!!! मी माझे विचार तुमच्यासमोर मांडले आहेत. त्यामध्ये काही चुकले असल्यास क्षमस्व!!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s