प्रेमाचा सुगंध भाग ३. ( शेवटचा)

वेदश्री चा CA चा निकाल आज सकाळी १० वाजता येणार होता. सकाळचे नऊ वाजून पन्नास मिनिटे झाले होते. निकाल यायला फक्त दहा मिनिटे बाकी होते. निशांत आणि वेदश्री दोघे जण रोजच्या टपरी च्या शेजारील गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेत होते. वेदश्री डोळे मिटून दोन्ही हात जोडून नमस्कार करत होती. निशांत ने लवकर दर्शन घेतले. तो तिच्याकडे पाहतच राहिला. तो मनात बोलू लागला, “काय तो भक्तीमधील लीन झालेला चेहरा, काय ते मनात बाप्पाला बघणारे सुंदर डोळे, काय ती भक्ती… बाप्पा सगळचं ओके आहे!!!…..” वेदश्री आणि निशांत लवकर दर्शन घेऊन रोजच्या टपरी वर मोबाईल काढून बसले. दहा वाजले. वेदश्री देवाचे नाव घेत साईट उघडून आपला बैठक क्रमांक आणि नंबर टाकून शोधले. तिला तिचा निकाल बघण्याची भीती वाटत होती. म्हणून तिने मोबाईल निशांत कडे देत त्याला निकाल बघायला लावला. ती डोळे मिटून बाप्पाचे नाव घेत होती. निकाल पाहून निशांत आनंद झाला. पण त्याने तिच्यासोबत गम्मत करायचे ठरवले. त्याने तिला सांगितले की, तुझा निकाल ३९ आला आहे…😣 ती रडायला लागली… तिच्या रडण्याचा आवाज आजूबाजूला असलेल्या लोकांपर्यंत पोहचत होता. ते बघून निशांत ने लगेच तिच्या कानात सांगितले, तुझा निकाल उलटा आहे… अभिनंदन…तिने लगेच त्याच्याकडे बघत विचार करून बघितले की, “३९ च्या उलटे म्हणजे ९३ !!” तिने लगेच उड्या मारत निशांत ला घट्ट मिठी मारली… बाकीचे लोक त्यांच्याकडे बघत हसत होते. निशांत ला काही कळेना. तो स्थिर उभा राहिला होता कारण त्याला तसा अनुभवही नव्हता. पण त्यालाही खूप आनंद झाला होता. त्याने लगेच दोन कप चहा आणि दोन छोटे केक आणून तिचे तोंड गोड केले. ते दोघे पहिल्यांदा मिठाई दुकानात जाऊन पेढे घेऊन नंतर मंदिरात जाऊन तिच्या हातून पेढे देवाला अर्पण केले. ती खूप खुश होती. 🥳

निशांत ला प्रेम तेव्हाच झाले होते जेव्हा वेदश्री ने क्लासच्या पहिल्या दिवशी पुढे बसून मागे वळून पाहिले होते….❤️😍 तो तिला सरप्राइज देणार होता. तो तिला एका ठिकाणी नेणार होता. त्याची हिम्मत होत नव्हती. वेदश्री ने त्याच्याकडे आपले ठरलेलं गिफ्ट मागितले. निशांत ने संध्याकाळचा प्लॅन ठरला होता. त्याच्या मित्रांनी त्याला मदत केली होती. त्याने तिला एकादे काम असल्याचे सांगून आणि तू संध्याकाळी मस्त कपड्यात तयार रहा असे सांगून निघून गेला. वेदश्री ला काही कळेना. तो पार्टी देणार असेल असे गृहीत धरून तिला अजून आनंद झाला. संध्याकाळी निशांत छान आवरून मस्त परफ्यूम मारून तयार होता. त्याने आपल्या मित्राची बाईक घेत तिला घ्यायला निघाला.

वेदश्री चा निकाल ऐकून तिचे आई वडील आनंदी होते. तिचे आई वडील तिला जरा काम आहे म्हणून बाहेर गेले. वेदश्री आवरून तयार झाली. घराच्या खाली निशांत ने तिला फोन करून खाली बोलावून घेतले. वेदश्री पटकन खाली येऊन निशांत सोबत बसून ते दोघे गेले. जवळ आल्यावर निशांत ने एक सरप्राइज असल्याचे सांगून तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली. आणि त्याने तिला त्या हॉल मध्ये आणले. त्याचे मित्र आणि वेदश्री च्या जवळच्या मैत्रिणी सुद्धा उपस्थित होत्या. निशांत ने वेदश्री ला मधोमध आणून तो खाली बसला.

वेदश्री च्या मैत्रिणींनी तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली आणि तिने डोळे उघडताच तिच्या समोर निशांत हातात गुलाबाचे फूल घेऊन एका गुडग्यावर बसला होता. बाजूला अंधार आणि मध्ये लाईट स्पॉट होता. वेदश्री ला हे पाहून आनंदाचा धक्का बसला. ती रडत तडत उभी होती. निशांत ने तिला गुलाबाचे फूल देत विचारले, ” तू माझी भविष्यातील बायको, हमसफर, माझी राणी होशील का?” तिने रडक्या लाजत्या आवाजात त्याच्या प्रेमाला होकार दिला.☺️ तिने फुल घेऊन निशांत ला घट्ट मिठी मारली आणि तिनेही प्रेमाची कबुली दिली.👩‍❤️‍👨 तिचेही निशांत वर प्रेम होते. पण ती बोलायला घाबरत होती.

वेदश्री निशांत ला सांगितले की, माझे आई वडील हे ऐकुन घेणार नाहीत. त्यांना हे मान्य होईल का? असे म्हणत ती घाबरली. त्यावर निशांत ने उत्तर दिले की, ” त्या बाजूला बघितलेच नाही वाटतं बघ एकदा” तिने तिकडे बघितले आणि आश्र्चर्य वाटले. तिथे निशांत चे आई वडील आणि तिचे आई वडील सोबत उभे होते आणि तिच्याकडे आनंदाने बघत होते. 😍 तिने निशांत कडे बघत रडत परत एकदा घट्ट मिठी मारली.❤️ निशांत ने तिच्या मऊ केसांवरून हात फिरवत तिला सतत आणि नेहमी सोबत असेन, नेहमी अडचणीत, दुःखात आणि सुखात साथ देण्याचे वचन दिले.💕💝 त्याने तिला आपल्यामध्ये सामावून घेतले.😍❤️💕💝👩‍❤️‍👨….

असा तो प्रेमाचा सुगंध त्यांच्या आजूबाजूला दरवळत राहिला. तो नेहमी दरवळत राहिला….💕👩‍❤️‍👨

त्या दोघांची अशी प्रेमकहाणी कशी वाटली… कमेंट मध्ये नक्की सांगा… 🎉🥳

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s