प्रेमाचा सुगंध भाग २.

निशांत स्वभावाने प्रेमळ, प्रामाणिक आणि साधा सरळ. सिनेमे बघत असल्याने आणि गाण्याची आवड असल्याने त्याला गाणे गायला आणि सिनेमांचा संवाद म्हणायला खूप आवडतं. मित्र मंडळी मर्यादित. आता ते मंडळी पुढील शिक्षणासठी बाहेर गावी गेल्याने त्याला करमत नसे. तो जास्ती वेळ घरातच घालवतो. थोडा अभ्यास करायचा, नंतर थोडा मनोरंजन म्हणून T.V. पहायचा, आणि नंतर हॉल मध्ये ठेवलेले पुस्तके वाचणे हा त्याचा दिनक्रम होता. पण त्या मुलीने आपल्याला thank you म्हणाली आणि आपण तिचे आज नाव विचारणार होतो पण आज विचारताच आले नाही. आपण तिला उद्या नाव विचारायचे असा विचार पक्का केला. माहितीच आहे की, निशांत मुलींशी जास्ती बोलत नसल्याने तो अस्वस्थ होता. त्या विचाराने त्याच्याकडून रोजची कामे होतच वनव्हती. रात्रीही झोप लागत नव्हती.

सकाळी लवकर क्लास ला येऊन तो आपल्या जागी बसला. ती तिच्या वेळी आली आणि रोजच्या जागेवर बसली. निशांत ला काहीही करून आज तिचे नाव जाणून घ्यायचेच होते. क्लास संपल्यानंतर त्याने लगेच पार्किंग मध्ये जाऊन तिच्या गाडीजवळ उभा राहिला. ती आली. निशांत ने लगेच हात पुढे करून आपली ओळख करून दिली. ” हाय!! माझे नाव निशांत… मी BBA ला आहे. ” तिने सुद्धा प्रतिक्रिया दिली, ” हाय, मी वेदश्री…मी सुद्धा BBA ला आहे पण न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज ला!”  निशांत हे नाव ऐकून भारीच वाटले. तिला आज लवकर कॉलेज ला जायचे असल्याने ती घाईत त्याला ” आपण उद्या बोलू” असे म्हणत गाडीवर गेली. तो घरी येता येता तिचा चेहरा आणि नावाचा विचार करत होता. त्यालाही खूप आनंद झाला होता. कारण, कोणत्याही मुलीने त्याला असे समोरून नाव सांगितले नव्हते.

ते तिथेच बसत. लेक्चर्स झाल्यानंतर ते सोबत बाहेर पडत. एकमेकांशी बोलत. अभ्यासाविषयी बोलत असत. असे दिवस जाऊ लागले. रविवारी सुट्टी असल्याने त्याला घरी करमायचे नाही. दुसऱ्या दिवशी पासून रोजचा दिनक्रम चालू होत. ते दोघे एकत्र जात असताना एका माणसाने चुकून निशांतच्या सायकल ला धडक दिली. तेव्हा तिने लगेच त्या माणसावर ओरडायला सुरवात केली. तिचे हे रूप त्याने पहिल्यांदाच पाहिले. नंतर त्या माणसानेच निशांत ची माफी मागून पुढे गेला. निशांत ने तिला विचारले की तू एवढी का चिडतेस. थोडासा तर धक्का लागला होता की. ती म्हणाली की, ” मी मराठी मुलगी आहे ना!” निशांत म्हणाला की, ” तुम्ही मराठी मुली तश्या तर स्वभावाने शांतच असतात पण जो कोणी तुमच्या नादाला लागल्यास तुम्ही त्यांची चांगलीच जिरवतात.👋💪 .” त्यांची मैत्री झाली होती…. पक्की मैत्री झाली होती… त्याला तिचा नंबर पाहिजे होता पण तिला कसा मागू हे त्याला कळत नव्हते.. त्याने तिचे आधीच तिचे तांडव रूप बघितले होते. तो नंबर मागायला घाबरत आहे हे वेदश्री ला समजत होते. पण ती सुद्धा हट्टी मुलगी. ती काय स्वतः हुन नंबर देणार नव्हती. निशांत ला तिचा स्वभाव माहीतच होता. पण जे होईल ते होईल असे म्हणत तो घाबरत तिच्यासमोर उभा राहून तिचा नंबर मागितला. तिने आधी त्याच्याकडे बघितले. घाबरलेल्या चेहऱ्याकडे बघत ती हसू लागली. निशांत ला काही कळेना. त्याने आपला चेहरा मोबाईल कॅमेरा मध्ये बघितला काहीही नव्हते सगळे काही ठीक होते तर ही का हसतीये??🙄 तिने त्याचे गाल ओढत त्याच्या हातातून त्याचा मोबाईल घेत तिचा नंबर डायल करून मिस्ड कॉल दिला. आणि नंबर सेव्ह केला. निशांत बघतच राहिला 😳. ती म्हणाली की मी काही एवढी चिडकी नाहीये. पण समोर काही चुकीचे होत असल्यास किंवा झाल्यास मला राग येतो. पण तू काळजी करू नको मी काही उगीच नाही ओरडणार तुझ्यावर. पण तू काही चूक केल्यास मी नक्की ओरडणार बर का ?😜 मैत्रीतील एक विलक्षण ताकद कोणती असेल तर त्यातील सहजता. त्या मधूनच सुरक्षित पणाची साय आपोआप धरते. साय दुधातूनच तयार होते आणि दुधावरच छत धरते. साय म्हणजे गुलामी नव्हे. सायीखालच्या दुधाला सायीचे दडपण वाटत नाही.

त्यांची मैत्री वाढतच जात होती. अभ्यासावरुन रोज चर्चा व्हायची. अकाउंट च्या प्रश्न उत्तर मध्ये त्या दोघांची उत्तर आपलेच कसे बरोबर यावरून वाद व्हायचा खरा पण निशांत चे उत्तर नेहमी बरोबर यायचे आणि वेदश्री चे चुकीचे. पण निशांत तिला कमी न लेखता तिला अकाउंटिंग त्याच्या पद्धतीने अजून चांगल्या रीतीने शिकवत असे. निशांत नेहमी तिला पुढे जाण्यास प्रोत्साहन देत असे. तिला CA करायचे आहे असे जेव्हा निशांत ला कळले, तेव्हा त्याने तिला दुसऱ्याच दिवशी CA करण्यासाठी लागणारा फॉर्म आणून दिला पण ती आपला अभ्यास पूर्ण न zalyache सांगून तो विषय पुढे ढकलत होती. पण तिच्या मनात अपयशी होण्याची भीती आहे हे निशांत ला चांगलेच ठाऊक होते. त्याने तिला असच सांगितले की, तू माझ्यासोबत अभ्यास केला आणि मी जे सांगेल ते धडे केलेस. आणि परीक्षेत पास झाली तर मी तुला एक खाऊ देईल. त्याच्या बोलण्याने तिच्या मनात असे वाटू लागले की, कोणाला तरी वाटतेय की मी CA व्हावे म्हणून. तिने त्याचं दिवसापासून जवळच्या ग्रंथालयात निशांत सोबत अभ्यास करायला सुरुवात केली. वेदश्री ला जेव्हा काही अभ्यासात अडचण येई तेव्हा निशांत तिला तो धडा किंवा तो विषय बारकाईने आणि पूर्ण सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत असे. उत्तम म्हणजे वेदश्री ला निशांत चे शिकविणे खूप आवडू लागले. निशांत च्या शिकवण्याने तिला तिच्या CA बद्दलच्या समस्या कमी झाल्या. सगळ्या गोष्टी समजू लागल्या. अभ्यास असाच चालू राहिला. CA ची परीक्षा जवळ येत होती तसे तसे वेदश्री चा अभ्यास पूर्ण होत होता. निशांत त्याच्या विषयाचे पुस्तक वाचत असे. त्यावेळी पावसाचा मौसम असल्याने तो शेजारच्या टपरी वरून दोन कप गरम चहा आणि कधी कधी एक प्लेट गरम भजी किंवा बटाटे वडे आणत असे. वेदश्री ला काय पाहिजे ते निशांत बघत असे. वही पाहिजे असल्यास तो वही आणून देत असे. असे चालूच असे. निशांत चे आई वडील रात्री येत असल्याने तो वेदश्री बरोबरच कॉलेज च्या वाचनालयात बसायचा.

परीक्षेचा दिवस उजाडला. वेदश्री बरोबर पेपर च्या दहा मिनिटे आधी पोहोचली होती. आधी ती क्लास मध्ये उशिरा येत असल्याने निशांत ने आधीच वेदश्री ला लवकर फोन करून उठविले होते. वेदश्री ला टेन्शन आले होते. पेपर झाला आणि नंतर लगेच तिने निशांत ला फोन करून पेपर झाला म्हणून सांगितले. निशांत ने तिला ग्रंथालयाच्या शेजारील टपरीवर बोलावले आणि दोन कप चहा मागवला. दोघांनी चहा पिऊन मन हलके केले. तिला फक्त आता निकालाची भीती वाटत होती. कारण तिला माहीत होते की आपण पेपर सगळा लिहिलं पण थोडे तिला टेन्शन होते.

निकालाचा दिवस उद्यावर आला. वेदश्री ला आधीच टेन्शन आले होते.आणि तिच्यामुळे निशांत ला ही चिंता वाटत होती… वेदश्री च्या मनाची काळजी निशांत त्याच्या मनापेक्षा जास्ती घेत होता. याची जाणीव म्हणजे मैत्री… हा असा मैत्रीचा सुगंध…

पुढे काय होतंय, वेदश्री चा निकाल काय येतो ते आपण पुढच्या भागात पाहूया… धन्यवाद….🙏