प्रेमाचा सुगंध…. भाग १.

” प्रेम म्हणजे नजरेतून हृदयापर्यंत चा एक गोड प्रवास प्रेम म्हणजे दोन जीव दोन हृदय पण एकच श्वास….” निशांत नावाचा एक मुलगा. तो तेव्हा फक्त बारावी वाणिज्य मधून पास झाला होता. त्याला बारावी ला नव्वद टक्के पडले होते. तो नगरचा राहणारा… त्याने पदवी शिक्षणासाठी नगरच्या नगर कॉलेज मध्ये प्रवेश घेतला होता. तो साधा होता. त्याच्या घरी त्याचे आई वडील दोन्ही कामावर जात असल्याने तो घरी एकटा असायचा. त्याला जास्ती कोणीच वेळ दिला नव्हता. त्याला प्रेम म्हणजे काय असते हेच माहीत नव्हते. त्याला मित्र जास्ती नव्हते. जे मित्र होते ते पुढच्या शिक्षणासाठी पुणे, मुंबई , नाशिक ला गेले.

निशांत ने कोचिंग क्लासेस लावले. त्याचा पहिला दिवस आज होता. निशांत क्लास मध्ये येऊन बसला. बाकीचे विद्यार्थी पण येऊन बसले. सर पहिल्याच दिवशी परिचय करून घेत होते. क्लास चालू होऊन दहा मिनिटे झाली होती. तेव्हा दरवाज्यातून एक स्कार्फ बांधलेली मुलगी आली. निशांत मुलींच्या लाईन च्या मागच्या बाकावर बसला होता. त्याच्या पुढची जागा रिकामी होती. ती मुलगी त्या बाकावर बसली. क्लास सकाळीच सात वाजता असल्याने निशांत ला कंटाळा आला होता. ती मुलगी आपला स्कार्फ काढताना चुकून स्कार्फ निशांत ला लागला. पण तिला ते कळेलच नाही. निशांत जागा झाला. आणि त्या मुलीला विचारणार तितक्यात त्याचे डोळे आणि चेहरा मस्त खुलला….. तिचे ते मोकळे केस…. सावळा चेहरा…. कपाळावर छोटी टिकली… कानात झुमके….ओठांवर लावलेली लाल लिपस्टिक… निशांत तिच्याकडे बघतच राहिला…. तिने मागे वळून पाहिले आणि निशांत ला तिचा स्कार्फ सोडायला इशारा केला…. निशांत ने लगेच भानावर येऊन स्कार्फ तिला दिला. नंतर निशांत च्या चेहऱ्यावर स्मितहास्य आले….. निशांत मुलींशी कमी बोलत असल्याने तो क्लास संपल्यावर लवकर घरी गेला.

दुसऱ्या दिवशी निशांत सकाळी क्लास ला आल्या आल्या पाऊस सुरू झाला⛈️⛈️. त्याने थोडक्यात वाचलो म्हणून देवाचे आभार मानले. तो कालच्याच जागेवर बसला होता. तेव्हा परत तीच मुलगी पावसात भिजून आली होती. केस ओले झालेले चेहेऱ्यावर पाण्याचे थेंब थेंब 💧💧पडल्यासारखे चेहरा ओला दिसत होता. डोळ्यांच्या पापण्या वरून थेंब पडत होते…. ती निशांत च्या पुढच्याच बाकावर बसली. तिने केस पुढे घेतलेले होते… निशांत चे लक्ष तिच्याकडेच होते. तिने तिचे ओले केस मागे घेतले. तिच्या केसंवरचे पाण्याचे शिंपडे निशांत च्या चेहऱ्यावर पडले. जणूकाही ते थेंब निशांत चे लक्ष शिकण्याकडे लावत होते📖. क्लास संपल्यावर तो सायकल वर जाता जाता त्या मुलीच्या विचारातच रमून गेला होता… एवढा रमून गेला की तो त्याच्या घराच्या पुढेही निघून गेला. एका खड्ड्यात सायकल चे चाक अडकले. तेव्हा त्याला कळले की आपण घराच्या खूप पुढे आलोय😂. त्याला त्या मुलीचे नाव माहीत नव्हते आणि ती काय शिकते हेही माहीत नव्हते. कारण BBA आणि B.com चा अभ्यासक्रम सारखाच होता. म्हणून सर एकत्र क्लास घेत होते… निशांत ने दुसऱ्या दिवशी नाव विचारायचे ठरवले.

निशांत क्लास ला लवकर गेला आणि तीही लवकर आली होती. रोजच्याच जागेवर ते बसले होते. सरांनी होमवर्क दिलेला होता. निशांत ने रात्रीच पूर्ण केला होता. त्यामुळे तो होमवर्क एकदा निरखून बघत होता. तिचा होमवर्क झाला नाहीये हे तिच्या चेहऱ्यावरून निशांत ला कळत होते. तेवढ्यात तिने मागे वळून त्याला म्हणाली, ” तुझा होमवर्क झाला असेल तर मला दे ना प्लीज…. ” तिच्या त्या सुंदर आवाजाने निशांत ने लगेच वही दिली आणि स्मितहास्य केले. तिने काही न बोलताच वही घेतली… आणि तिचा होमवर्क झाल्यावर तिने वही निशांत ला परत करून thanks म्हणाली. ती पुढे बोलणार इतक्यात सर आल्याने तिचे बोलणे राहून गेले. निशांत ने बाकावर डोके ठेऊन स्वतः शी हळू आवाजात म्हणाला की सर 2 मिनिटे उशिरा आले असते तर काही झाले असते का ? आमचे बोलणे अर्धवटच राहिले ना.. काय माहिती ती पुन्हा कधी बोलेल देवच जाणे…” ती पुढे बसली असल्याने तिला हे ऐकू गेले. आणि ती गालात हसली…❤️

निशांत ला त्या मुलीचे नाव कळेल का? त्यांची मैत्री होईल का? हे आपण पुढच्या भागात पाहूया….

भाग आवडल्यास नक्की प्रतिक्रिया पाठवा….