🇮🇳 भारत 🇮🇳

आजकाल जगात अजूनही काही ठिकाणी भारताबद्दल संभ्रमता आहे. जगातील काही द्यायचं अजूनही लोक आजच्या भारताला विसाव्या शतकातील देश समजत आहे अशा बाबतीत बातम्यांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलायचे आढळून येते.

याबाबतीतले एक दृश्य अक्षय कुमार च्या ” नमस्ते लंडन” या चित्रपटात दर्शविलेले आहे. ते मी माझ्या पद्घतीने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. देशाबद्दल लिहीत आहे, तर लिहिण्यात काही चूक झाल्यास मला माफ करा.

त्यांना आता नवीन भारताची ओळख करून देणे आवश्यक आहे.

भारत हा प्राचीन देश आहे. सगळ्या देवतांचे जन्मभूमी भारत आहे. संपूर्ण ब्रह्मांड भारत देशातून चालला आहे.अनेक राजा महाराजांनी भारतावर राज्य केले. अनेक महापुरुष या देशात होऊन गेले आहे. या देशाने संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध बघितले आहे आणि देशासमोर शत्रू चालून आल्यास महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज पण बघितले आहे.

“हम हाथ मिलाना भी जानते है.. उखाड़ना भी… हम गांधी जी को भी पूजते है और चंद्रशेखर आज़ाद को भी…”

संस्कृत ही जगातील सर्वात प्राचीन भाषा भारताची पहिली मातृभाषा. याच संस्कृत भाषेपासून अनेक भाषांचा उदय झाला आहे. उदा. बंगाली, गुजराथी, हिंदी आणि पंजाबी. इंग्रजी भाषेतले काही शब्द सुद्धा संस्कृत मधून घेण्यात आले आहेत.

भारतात एकूण १२१ भाषा आणि २७० मातृभाषा आहेत. स्वतंत्र २२ अधिकृत भाषा आहेत. जगात सर्वाधिक बोलली जाणारी इंग्रजी भाषा सर्वाधिक पणे भारतात बोलली जाते. भारतात २३ भाषांमध्ये वर्तमानपत्रे वाचली जातात. वर्तमानपत्र वाचणाऱ्यांची संख्या ४४ करोड आहे.

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. मोठा प्रजासत्ताक देश आहे.

भारत देश २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी बनलेला आहे.

भारत जगातील सर्वात धर्मनिपेक्ष देश आहे. त्यात जगात सर्वाधिक ७ धर्मांचे लोक राहतात. हिंदु , मुस्लिम, शीख, जैन, बुद्ध, पारशी, ख्रिचन भारतात राहतात.

भारत हा जगातील लोकसंख्येच्या बाबतीत २ रा आहे. भारत हा जगात सर्वात तरुण देश आहे. जगातील १२० कोटी तरुण लोकसंख्येपैकी सर्वाधिक २३ कोटी तरुण लोकसंख्या भारतात आहे.

भारतात सर्वात सक्षम अंतराळ संस्था इस्रो ISRO आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळयानाद्वारे मंगळ ग्रहापर्यंत पोहचणारा भारत पहिलाच देश आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे की, इस्रो ने केवळ ४५० कोटी खर्च करून मंगळयान ला मंगल ग्रहाच्या कक्षेत स्थापन केले. इस्रो चे अंदाजपत्रक नासाच्या अंदाजपत्रक पेक्षा १३ पट कमी.

भारताचा जगात सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणाऱ्या प्रथम ५ देशांत समावेश आहे. २०२१ मध्ये भारतात ४,८६० कोटी डिजिटल व्यवहार झाले, ते जगात सर्वाधिक आहेत.

४०३.७६ gigavatt उत्पादन क्षमतेसह भारत जगात तिसरा सर्वात मोठा वीज उत्पादक देश आहे. भारत हा जगातील सर्वात उर्जावान देश आहे. सर्वात जास्त थोरियम चा साठा भारताकडे आहे. नविनिकरण ऊर्जानिर्मिती करण्याच्या बाबतीत आपण जगात तिसऱ्या स्थानी आहोत. ” विकसनशील देशांत अनुभट्टीपासून वीजनिर्मिती करणारा भारत एकमेव देश आहे.

भारत ही जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.भारताचा आर्थिक वर्ष २०२१-२२ नोमिनल GDP हा $३.३ ट्रिलियन डॉलर्स होता. भारतात जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इको सिस्टम आहे. २०२१ -२२ या आर्थिक वर्षात भारतात १४,००० नवीन उद्योग उदयास आले. भारत हा सध्या तयार हिऱ्यांचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) हे जगातील तिसरे सर्वात मोठे शेअर बाजार आहे.

सर्वात उत्पादक कृषी क्षेत्र – डाळी, मसाले, आंबे, केळी, पपई, आणि ज्यूट च्या उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर येतो. गहू, तांदूळ, टोमॅटो,बटाटे, कांदे, शेंगदाणे यांच्या उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. चहा उत्पादनाबाबत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारत हा जगातील सर्वाधिक साखर उत्पादक देश आहे. एकूण गरजेच्या २०% गरजा एकटा भारत पूर्ण करू शकतो.

भारत देश हा सर्वोत्कृष्ट क्रीडक्षेत्र आहे. क्रिकेट, बुद्धिबळ, कबड्डी, आणि हॉकीत जगज्जेेता झालेला एकमेव देश आहे. भारतभर दर वर्षी खेलो इंडिया उपक्रमांद्वारे खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते. त्यामधून यशस्वी झालेले खेळाडू भारताचे आंतरराषट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करतात.

दरवर्षी सर्वाधिक चित्रपट प्रदर्शित करण्यात भारताचा पहिला क्रमांक येतो. दरवर्षी देशात १८००- २००० चित्रपटांची निर्मिती होते. सर्वाधिक तिकीट विक्रीत भारताचा पहिला क्रमांक. तर तिकिटातून महसुलाच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानी येतो.

प्राचीन आयुर्वेदाचा इतिहास असणारा भारत हा सर्वाधिक आरोग्य कवच असणारा देश आहे. सर्वाधिक स्वदेशी लसींचा उत्पादक आणि निर्यातदार आहे. जेनरिक औषधांचा भारत हा पुरवठादार आहे.

जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये भारतीयांचा समावेश आहे. उदा. गूगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, टेस्ला, नासा, ऍपल, फेसबुक इत्यादी. जगातील प्रत्येक देशात भारतीयांचा समावेश आणि त्यांचे तिथल्या अर्थव्यवस्थेत योगदान आहे. सुंदर पिचाई ( CEO, गुगल), सत्या नाडेला ( सीईओ, मायक्रोसॉफ्ट) शंतनु नारायण (सीईओ) इत्यादी.

भारतात जगातील सर्वात मोठी शैक्षणिक व्यवस्था आहे. ह्या शैक्षणिक व्यवस्थेत २६ कोटी शालेय विद्यार्थी सह ३० कोटी लोक शिकत आहेत. भारतात सरकारी शाळांत १६.१७ कोटी आणि खासगी शाळांत ९.५ कोटी मुले शिकत आहेत. देशात ९७ लाख शिक्षक, १५ लाख शाळा, ४२ हजार महाविद्यालये, १०४३ विद्यापीठे आहेत. भारत १२ कोटी मुलांसाठी सर्वात मोठी मध्यान्ह भोजन योजना चालवत आहे.

“भारतीय लष्कर” हे जगातील ४ थे सर्वात मोठे लष्कर आहे. “भारतीय नौदल” हे जगातील सर्वात शक्तिशाली नौदलात ७ व्या क्रमांकावर आहे. “भारतीय वायुदल” हे जगातील सर्वात शक्तिशाली वायुदलात ४ थ्या क्रमांकावर आहे. भारतात “मुंबई पोलीस दल” हे जगातील दुसरे सर्वोत्कृष्ट पोलीस दल आहे.

सुन्दर है जग में सबसे, नाम भी न्यारा है,
जहाँ जाती-भाषा से बढ़कर, देश-प्रेम की धारा है,
निशचल, पावन, प्रेम पुराना, वो भारत देश हमारा है। 🇮🇳जयहिंद!! जय भारत! वंदे मातरम्!!🇮🇳

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s